रेल्वेखाली झोकून एका वृद्धेने आत्महत्या केल्याची घटना तिसऱ्या रेल्वे गेट जवळ सायंकाळी साडे चार च्या सुमारास घडली आहे.
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी साडे चार च्या दरम्यान डी मार्ट च्या मागील बाजूच्या रेल्वे ट्रॅक वर ही घटना घडली आहे. मयत महिलेकडे असलेल्या बस पास वरून तिची ओळख पोलिसांनी पटवली असून तिचे नाव मेहबुबी रावत वय 70 रा.मुस्लिम गल्ली मजगावं असे असण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
घटना पहाण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती
रेल्वे पोलीस उपनिरीक्षक स्वतः घटनास्थळी असून पंचनामा केला आहे या प्रकरणी रेल्वे पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.