कर्नाटक राज्य द्राक्षारस महामंडळ फलोत्पादन खाते यांच्या संयुक्त विध्यमाने 18 ते 20 आगष्ट पर्यंत तीन दिवस टिळक वाडी येथील मिलेनियंम गार्डन मध्ये आंतरराष्ट्रीय वाईन फेस्टिव्हल चे आयोजन करण्यात आले आहे.
देश विदेशातील विविध प्रकारच्या ब्रँड प्रदर्शन आणि विक्री या प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहे.
क्लब रोड येथील फलोत्पादन खात्याच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत द्राक्ष महामंडळ अध्यक्ष रवींद्र मिरजी टी सोमु, फलोत्पादन खात्याचे उपसंचालक आय के दोडमनी यांनी ही माहिती दिली.गेली तीन वर्षे बेळगावातील फेस्टिव्हल यश पाहून हा फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला आहे.महाराष्ट्र आणि कर्नाटकातील 12 ते 15 वाईन कंपन्या भाग घेणार असून 150 हुन अधिक प्रकारचे वाईन प्रदर्शन आणि विक्री या फेस्टिव्हल मध्ये करण्यात येणार आहे.
फ्रान्स युरोप चिली,न्यूजीलंड दक्षिण आफ्रिकेचे जगप्रसिद्ध ब्रँड ठेवण्यात येणार आहे.
मिलेनियम गार्डन मध्ये 20 रुपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले असून 18 रोजी पालकमंत्री रमेश जारकीहोळी या वाईन फेस्टिव्हलचे उदघाटन करणार आहेतया कार्यक्रमास आमदार संभाजी पाटील उपस्थित राहणार आहेत.