भोंदू साधूंविरुद्ध कुंभमेळ्याच्या वेळी सनातन संस्थेने मोहीम चालवली होती. या विषयावर ग्रंथही प्रकाशित केले आहेत. सर्वच संत भोंदू असतात, हे सूत्र मांडण्यात येत आहे. त्याला आमचा आक्षेप असून वस्तूस्थिती तशी नाही, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी २५ ऑगस्ट या दिवशी ‘एबीपी माझा’ या वाहिनीवरील चर्चासत्रात केले. या वेळी अन्य मान्यवरांनीही त्यांची मते मांडली.
वर्तक पुढे म्हणाले की, शाही इमाम यांच्यावर दीडशे गुन्हे प्रविष्ट आहेत, त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. पोप फ्रान्सिस यांनी सांगितले की, जगभरातील २ टक्के पाद्री हे लहान मुलांशी लैंगिक शोषण करणारे आहेत. सर्वच धर्मातील भोंदूगिरी बंद झाली पाहिजे, तसेच सर्वत्रची गुंडशाही बंद झाली पाहिजे. पंचकुला येथे ओबी व्हॅनची नासधूस करण्यात आली, तशीच आझाद मैदान येथेही करण्यात आली; मात्र अद्याप नासधूस केल्याची वसुली करण्यात आलेली नाही. बंगाली बाबांच्या रल्वेमध्ये लावलेल्या विज्ञापनांवर कारवाई करण्यात येत नाही