एक मराठा लाख मराठा यासाठी महाराष्ट्रासह बेळगावात काढण्यात आलेल्या क्रांती मोर्चाचे पडसाद गणपती उत्सवात पहायला मिळत आहेत.
भारतनगर वडगाव येथील संदीप खननुकर यांनी बेळगावातील क्रांती मोर्चा देखावा सादर करुन मागास असलेल्या मराठा समाजास आरक्षण ध्या तसेच बेळगाव सह सीमा भाग महाराष्ट्रात विलीन करा अश्या मागण्या गणपती समोर देखाव्या द्वारे करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
भारतनगर वडगाव येथील सागर आणि संदीप खननुकर या दोघा बंधुंनी हा देखावा सादर केला असून बेळगाव मोर्चातील मागण्या प्रत्येक चित्रात लेखी स्वरूपात दाखवल्या आहेत कपिलेश्वर उड्डाण पुलावरून काढलेला गर्दीचा फोटो तसच महाराष्ट्रातील इतर क्रांती मोर्चाचे गर्दीचे फोटो देखील देखाव्याच्या मागे लावण्यात आले आहेत.गणपतीच्या समोर कागदाने बनविलेल्या माणसांची गर्दी आणि त्यांच्या हातात मागण्याचे फलक देण्यात आले आहेत.
बेळगावातील आपला मराठा समाज एकत्रित यावा मागासलेल्या मराठ्यांना आरक्षण मिळावं आणि सीमा प्रश्ननाची तड लागावी यासाठी।जनजागृती म्हणून हा घरघुती असा क्रांती मोर्चा देखावा आपण गणेश उत्सवाच्या माध्यमातून केला आहे अशी माहिती संदीप खननुकर यांनी बेळगाव live शी बोलताना दिली आहे. जस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे देखावे पहाण्यास गर्दी होते तशी रयत गल्ली भारत नगर भागातील देखावे पाहण्यास लोकांची गर्दी होत आहे.