कर्नाटकचे माजी सभापती तसेच माजी औद्योगिक सहकार खात्याचे मंत्री रामभाऊ पोतदार अनंतात विलीन झाले. येथील शहापूर स्मशानभूमीत शासकीय इंतमामात त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आले.
त्यांचे पुत्र अविनाश पोतदार यांनी त्यांना भडाग्नी दिला.
रामभाऊ यांचे जवळचे संबंध असलेले माजी पंतप्रधान देवेगौडा, तसेच स्थानिक पुढाऱ्यांमध्ये खासदार सुरेश अंगडी, माजी पालकमंत्री सतीश जर्किहोळी, आमदार संजय पाटील, माजी मंत्री सच्चिदानंद खोत तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आणि आजी माजी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
रामभाऊ यांच्या जाण्याने मोठी हानी झाली असे मत यावेळी व्यक्त झाले.
पोलिसांनी बंदुकीच्या तीन फैरी झाडून त्यांना सलामी दिली.
Trending Now