कर्नाटक राज्य सरकारने आज सकाळी हिवाळी अधिवेशन कुंदानगरी बेळगाव येथे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
विधानसभा सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत विश्वेश्वर हेगडे कागगेरी यांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले की, डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशन होईल. हे अधिवेशन बेळगावात घेण्याचा सरकारचा विचार आहे.
कोविड आणि लॉकडाऊनच्या प्रभावामुळे हिवाळी अधिवेशन बेळगावात घेणे खंडित झाले.
आता त्याची वेळ आली आहे. बोम्माई सरकारने बेळगावात या वेळी अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज त्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे सभापतींनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे दिसून येत आहे.