Saturday, January 25, 2025

/

आता कोविड नियम गेले कुठे?

 belgaum

आपल्या न्याय्य हक्कांसाठी मोर्चा व आंदोलन करणाऱ्या मराठी भाषिक नागरिकांवर मोठ्याप्रमाणात गुन्हे दाखल करणाऱ्या बेळगाव जिल्हा प्रशासनाने आता कोविड नियम बासनात बांधून ठेवले आहेत का? असा प्रश्न गुरुवारी झालेल्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित झाला आहे .

मोर्चा काढून कोविडच्या नियमांचे उल्लंघन केले म्हणून 200 मराठी भाषिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आणि आज गुरुवारी हजार विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सुवर्ण विधानसौधच्या पायऱ्यांवर जाहीरपणे कन्नड गीते गाण्याचा कार्यक्रम झाला.हा विरोधाभास कशासाठी? आता कोविड नियम नाहीत का असा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला असून याची दखल केंद्र सरकार ,महाराष्ट्र शासन आणि मानव हक्क आयोगानेही घ्यावी अशी मागणी होऊ लागली आहे.

यासंदर्भात ट्विटरवर मोहीम राबविण्यात येत असून ट्विटर मोहिमेच्या माध्यमातून कर्नाटकाच्या बेळगाव जिल्हा प्रशासनाचा दुजाभाव, मराठी माणसाला पाण्यात बघण्याची परिस्थिती आणि आपण करे सो कायदा या संदर्भात चर्चा होऊ लागली आहे.सुवर्ण विधानसौधच्या पायऱ्यांवर कन्नड गीते गाण्याचा कार्यक्रम झाला त्यावेळी एक हजारहून अधिक विद्यार्थी दाटीवाटीने एकमेकाला चिकटून उभे होते. अशा परिस्थितीत कोविडच्या नियमांचे पालन केले गेले का? असा प्रश्न सध्या सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत.Soudha Soudha songs

 belgaum

कर्नाटक सरकारच्या बेळगाव जिल्हा प्रशासनाने कोविडच्या नियमांचा आधार घेऊन मराठी माणसांवर गुन्हे दाखल केले. मग आता जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियम भंगाबद्दल त्यांच्यावर गुन्हे दाखल कोण करणार? स्वतः जिल्हाधिकारी या कार्यक्रमात उपस्थित होते. कोविड च्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत होते.

अशावेळी जिल्हाधिकाऱ्यांवर कोणता गुन्हा दाखल केला जाणार? असा प्रश्न विचारला जात आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारचा दुजाभाव स्पष्टपणे समोर आला असून या कार्यक्रमावर जर गुन्हे दाखल झाले नाहीत तर कोविड नियमावलीचा भंग केला म्हणून इतरांवर केलेली कारवाई मागे घेतली जाणार का? असा प्रश्नही विचारला जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.