बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या प्रयत्नातून महांतेशनगर येथील अक्कामहादेवी मार्गावरील इमारतीमध्ये अत्याधुनिक अनुभव मंडपाची उभारणी करण्यात येणार असून यासाठी 5 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
सदर इमारतीची गदगचे तोंटदार्य पु. श्री. डॉ सिद्धाराम महास्वामी यांनी शनिवारी पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत आमदार ॲड. अनिल बेनके व इतर मान्यवर उपस्थित होते.
बाराव्या शतकातील हिंदू तत्वज्ञानाचे प्रचारक जातीय विरोधात व समाजात समता प्रस्थापित करण्यासाठी लढणारे जगतज्योती बसवेश्वर यांचे जीवन कार्य समाजाला समजावून देण्याकरता बेळगावात लवकरच अनुभव मंडप उभारण्यात येणार आहे.
आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या प्रयत्नातून या मंडपाची उभारणी होणार आहे. सदर 5 कोटी रूपये खर्चातून उभारण्यात येणाऱ्या या अत्याधुनिक अनुभव मंडपामध्ये ग्रंथालय, अभ्यासिका (रेडींग रूम),
बसवेश्वरांनी त्या काळात उभारलेल्या संसद सभागृहाप्रमाणे सभागृह, या ठिकाणी बसवेश्वरांच्या वचनांची (काव्य) पाच-सहा भाषांमधील ऑडिओ -व्हिडिओद्वारे माहिती करून देण्याची व्यवस्था असणार आहे.