बेळगाव अर्बन डेव्हलपमेंट अथोरिटी अर्थात बुडाच्या माध्यमातून होणाऱ्या विकासाला आमचा कधीही विरोध नाही .बेळगाव शहराच्या विकासाला आमचा सदैव पाठिंबा असेल असे यमकनमर्डी चे आमदार आणि कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सतीश जारकीहोळी यांनी आज स्पष्ट केले.
बुडाच्या कार्यालयात जाऊन विशेष बैठक घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बातचीत केली .बेळगाव शहरातील दोन आमदारांनी बुडा अध्यक्षपद बदलले असून अंतर्गत राजकारणातून झालेली ही मनमानी आहे. त्याबद्दल कोणालाही विश्वासात घेतले नसल्यामुळे आम्हाला हा प्रकार अमान्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
विकासाच्या मुद्द्यावर राजकारण केले जाऊ नये. याच भूमिकेतून आपण काम करत असून पुढील काळातही असेच स्वरूप असले जावे .असे म्हणणे आहे. दरम्यान विकासाला आपला कोणताही विरोध नसल्याचे त्यानी स्पष्ट केले आहे.
.बेळगाव महानगरपालिकेत दाखल होऊन महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर सतीश जारकीहोळी यांनी आज बुडा कार्यालयाला भेट दिली .तेथे त्यांनी आढावा बैठक घेऊन विकासासंदर्भात आपण सदैव साथीला असल्याचे स्पष्ट केले.