तब्बल ३८ लाख रुपये किमतीचे सोने बेल्टमध्ये अडकवून फिणाऱ्या एकाला हुबळी पोलिसांनी अटक करून ८०४ ग्राम सोने जप्त केले आहे.
सोन्याची तस्करी कोण कशाप्रकारे करेल हे सांगता येत नाही. कमरेला बांधावयाच्या पट्ट्यात सोने लपवून घेऊन जाणाऱ्या एकाला हुबळी उपनगर पोलिसांनी रविवारी रात्री ताब्यात घेऊन त्याच्याकडील बेहिशोबी सोने जप्त केले.
या प्रकरणी केशवपूरमधील मधुरा इस्टेटमधील रहिवासी चेतन देवेंद्रप्पा जन्नु याला अटक करण्यात आली आहे.
पक्की खबर मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला गिरणीचाळ भागातील ७ मुलांच्या माता मंदिरामागे त्याला ताब्यात घेतले.
त्याची झडती घेतली असता, त्याने कमरेला बांधायच्या बेल्टमध्ये ८०४.१ ग्राम वजनाचे ३८ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोने लपविल्याचे आढळले. ते जप्त करण्यात आले. या प्रकरणी हुबळी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.