मालमत्ता नोंदणीसाठी नागरिकांकडून बेकायदेशीररित्या मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्यात येत असलेल्या वाढत्या तक्रारींची दखल घेऊन अथणी सब रजिस्ट्रार कचेरीसह गावातील 11 बाॅन्ड राईटर्सच्या कार्यालयांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) आज दुपारी धाडी टाकून झडती घेतली.
भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाचे (उत्तर) एसपी आर. एस. न्यामगौडर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डीवायएसपी करूणाकर शेट्टी व मंजुनाथ गंगल यांच्या नेतृत्वाखाली सहा पोलिस निरीक्षकांसह 30 हून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांचा उपरोक्त धाड सत्रात सहभाग होता.
अथणी सब रजिस्ट्रार कचेरीवर टाकण्यात आलेली आजपर्यंतची ही सर्वात मोठी धाड असल्याचे बोलले जात आहे.
एसीबीच्या सदर धाडीप्रसंगी पोलिस निरीक्षक सुनीलकुमार गळाद, अडिवेश हळ्ळी, विजय मठपती, समीर मुल्ला, परमेश्वर कवटगी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कागदपत्रांची तपासणी करून झडती घेतली.