Sunday, December 22, 2024

/

‘पोटनिवडणुक तीन ठिकाणी असली तरी जिल्हाभर आचारसंहिता’

 belgaum

21 ऑक्टोंबर रोजी बेळगाव जिल्ह्यातील 18 पैकी तीन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली असली तरी संपूर्ण जिल्ह्यामध्ये आजपासून आचारसंहिता लागू झालेली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळळी यांनी दिली.
शनिवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी पोलीस आयुक्त बीएस लोकेश कुमार जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निम्बर्गी अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक धुडगुंट्टी मनपा आयुक्त के वी जगदीश यांच्यासह जिल्हा निवडणूक कक्षातील अधिकारी उपस्थित होते.

23 सप्टेंबरपासून अधिसूचना लागू होणार असून 30 सप्टेंबर ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असून 1 ऑक्टोंबर रोजी अर्जांची छाननी तीन ऑक्टोंबर अर्ज मागे घेणे 21 ऑक्टोंबर मतदान तर 24 रोजी निकाल होईल अशी प्रक्रिया जाहीर केली. 1 सप्टेंबर 2019 च्या मतदार यादी पुनर्रचना प्रमाणे ही निवडणूक होणार असून 30 सप्टेंबरपर्यंत मतदार यादीत नावे समाविष्ट करू शकतात असे सांगितले.

निष्पक्ष आणि शांततेत निवडणूक करण्यासाठी जिल्ह्यातील प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणा सज्ज असून जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूची प्रमाणे निवडणूक होईल. आचारसंहिता लागू होताच जिल्ह्यातील मंत्री आणि आणि खासदाराना दिलेली शासकीय वाहने काढून घेण्यात आलेले आहेत असेही त्यांनी नमूद केले.अथणी सह महाराष्ट्र कर्नाटक आणि कर्नाटक गोवा या राज्यांला जोडणाऱ्या सीमेवर चेक पोस्ट उभे केले जाणार आहेत आणि बेकायदेशीर वाहतुकीवर करडी नजर ठेवली जाणार आहे.

पुग्रस्तांना मिळेल मदत

आचारसंहिता लागू झालीअसली तरी राज्य सरकारकडून पूरग्रस्तांना देण्यात येणारी मदत ही सुरूच राहणार आहे निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेत पूरग्रस्तांना मदतीला मुभा देण्यात आलेली आहे मात्र जनता किंवा राजकीय पक्षांना पूरग्रस्तांना कोणतीही मदत देण्यास मनाई करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.

असे आहेत मतदार

अथणी विधानसभा मतदारसंघात एकूण मतदार संख्या दोन लाख 17 हजार 974 आहे त्यात 112176 पुरुष,105796 महिला मतदार दोन इतर मतदार आहेत.कागवाड मतदार संघात 185443 मतदार संख्या असून 95786 पुरुष तर 89657 महिला मतदार आहेत. गोकाक मतदारसंघात 242124 एकूण मतदार असून119737 पुरुष तर 122373 महिला मतदार 14 इतर आहेंत एकूण तीन मतदारसंघात 645541 मतदार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.