19 C
Belgaum
Wednesday, March 22, 2023
 belgaum

Daily Archives: Sep 18, 2019

मार्कंडेय ची पोते(भरू)दारी सुरूच

मार्कंडेय साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण बैठक आज झाली आहे. अध्यक्ष अविनाश पोतदार यांच्या नेतृत्वाखालील पोतेदारी पुन्हा सुरू झाली आहे. आणखी सात कोटीची गरज असून आणखी भागधारकांनी शेअर्स जमा करून द्यावेत अशी मागणी या बैठकीत करण्यात आली आहे. यावर्षीचा गाळप हंगाम...

बेळगावच्या बिशपांनी केला पोप यांचा सत्कार

बेळगावचे बिशप रेव्हरंड डॉ.डेरेक फर्नाडिस हे सध्या रोमच्या दौऱ्यावर असून ते अड लुमिना मीटिंगमध्ये भाग घेणार आहेत.मंगळवारी बिशपनी पोप फ्रान्सिस यांचा भारतीय पारंपरिक पद्धतीने शाल घालून सत्कार केला.यावेळी पोपनी बेळगाव डायोसिस च्या कार्याची प्रशंसा केली. विशेष म्हणजे पूरग्रस्तांना केलेल्या मदत...

‘इंडिगोची बंगळुरू नंतर हैद्राबाद विमानसेवा’

नुकताच बेळगाव विमान तळावरून सुरू झालेल्या बेळगाव बंगळुरू या विमानसेवे नंतर इंडिगो या विमान कंपनीने बेळगाव हैदराबाद ही विमान सेवा देखील सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी 27 ऑक्टोबर पासून इंडिगो कंपनीने  बेळगाव हैदराबाद विमान सेवा सुरू करणार आहे आहे...

अन्नभाग्य योजनेतील मोठा अन्नसाठा जप्त

अन्नभाग्य योजनेतील तांदूळ आणि रॉकेलचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्तीच्या घरावर अन्न आणि नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांनी तसेच शहापूर पोलिसांनी धाड टाकून चोवीस क्विंटल तांदूळ ,24 कॅन रॉकेलचा साठा आणि 70 किलो डाळ जप्त केली. भारत नगर दुर्गादेवी मंदिरासमोर राहणाऱ्या विनोद चौगले...

…. अन्यथा आंदोलन – युवा समितीचा इशारा

प्राथमिक मराठी शाळांच्या इमारतीत इतर माध्यमाच्या शाळा भरवल्या जात आहेत ही मराठी शाळा मधील घुसखोरी थांबवा अशी मागणी युवा समितीने केली आहे.बुधवारी सकाळी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा शिक्षणाधिकारी ए बी पुंडलिक यांना निवेदन देत त्यांनी...

हतबल येडिं बरोबर पूरग्रस्त ‘जनताही ठरतेय येडी’

केंद्र सरकारकडे 30 हजार कोटीचे नुकसान दाखवून नुकसानीची भरपाई मागणारे कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा सध्या हतबल ठरले आहेत.कर्नाटक विधानसभेचे बेळगावचे अधिवेशन रोखून त्याचा पैसा पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय त्यांना घ्यावा लागला आहे. केंद्राचे अधिकारी आणि मंत्री येऊन गेले पण...

प्रामाणिक रिक्षाचालकाचे होत आहे कौतुक

बेळगाव शहरात अनेक रिक्षाचालक प्रामाणिकपणे सेवा बजावतात. अशाच एका प्रामाणिक रिक्षाचालकाचे सध्या कौतुक होत आहे. संदीप श्रीकांत पवार असे रिक्षा चालकाचे नाव आहे. त्याच्या रिक्षामध्ये वंदना विनायक पवार ही महिला बसली होती. रिक्षातून उतरून जाताना त्या रिक्षामध्ये बॅग विसरल्या. त्यामध्ये...

तब्बल सहा महिन्यानंतर मिळाली दहावीची प्रमाणपत्रे

दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा संपून सहा महिने लोटले. मात्र त्याचे प्रमाणपत्र अजून मिळाले नव्हते. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चांगलीच नाराजी दिसून येत होती. शिक्षण खात्याच्या आंधळ्या कारभाराबद्दल संताप व्यक्त करण्यात येत होता. पण सहा महिन्यानंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. त्यामुळे अनेक...

ता.प. कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बदलीचे जोरदार प्रयत्न

मागील दोन महिन्यापूर्वीच तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी म्हणून मल्लिकार्जुन कलादगी यांची निवड झाली आहे. मात्र सरकार बदलले की राजकारण बदलते. त्यामुळे याच राजकारणाचा एक भाग म्हणून नुकतीच रुजू झालेल्या तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बदली संदर्भात अनेक नेत्यांनी आणि काही...

कंग्राळी खुर्द गावात कारच्या धडकेत युवक ठार

बेफाम वेगाने जाणाऱ्या गोवा पासिंगच्या कारने गल्लीतून चालत जाणाऱ्या पादचाऱ्याला पाठीमागून ठोकर दिल्याने पादचारी युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना कंग्राळी खुर्द येथे घडली आहे. अशोक श्रीराम राजभर वय 25 (मूळचा देवडीया उत्तर प्रदेश)सध्या राहणार कंग्राळी खुर्द असे या अपघातात मयत...
- Advertisement -

Latest News

नितीन गडकरी यांना धमकी हिंडलगा कारागृहातून, नागपूर पोलीस बेळगाव कडे रवाना

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी धमकीचे तीन फोन आल्याची माहिती समोर आली आहे. या तीन फोन...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !