Saturday, April 20, 2024

/

‘इंडिगोची बंगळुरू नंतर हैद्राबाद विमानसेवा’

 belgaum

नुकताच बेळगाव विमान तळावरून सुरू झालेल्या बेळगाव बंगळुरू या विमानसेवे नंतर इंडिगो या विमान कंपनीने बेळगाव हैदराबाद ही विमान सेवा देखील सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

आगामी 27 ऑक्टोबर पासून इंडिगो कंपनीने  बेळगाव हैदराबाद विमान सेवा सुरू करणार आहे आहे या अगोदर स्पाईस जेट ची बेळगाव हैद्राबाद विमान सेवा सुरू आहे त्यानंतर हे दुसरं बेळगाव हैदराबाद दरम्यान धावणारे विमान असणार आहे.

बेळगाव बंगळूर आणि बेळगाव मुंबई नंतर एका शहराला बेळगाव हून दररोज दोन विमान सेवेने जोडणारे हैद्राबाद तिसरं शहर ठरणार आहे.

स्पाईस जेट नंतर इंडिगोने देखील आपली हवाई सेवा बेळगाव हुन वेगवेगळ्या ठिकाणी वाढवली आहे त्यामुळे स्पाईस जेट नंतर इंडिगो हा एक ऑप्शन बेळगावातील विमान प्रवाश्यांना मिळत आहे.

इंडिगो ए टी आर प्रकारचे विमान सोडणार असून त्याचे वेळा पत्रक खालील प्रकारें आहे .

6E7966 – हैद्राबाद ते बेळगाव -3:35 pm ते 4:55pm

6E7968-बेळगाव ते हैद्राबाद- 5:15 pm ते 6:40 pm

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.