Thursday, April 18, 2024

/

अन्नभाग्य योजनेतील मोठा अन्नसाठा जप्त

 belgaum

अन्नभाग्य योजनेतील तांदूळ आणि रॉकेलचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्तीच्या घरावर अन्न आणि नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांनी तसेच शहापूर पोलिसांनी धाड टाकून चोवीस क्विंटल तांदूळ ,24 कॅन रॉकेलचा साठा आणि 70 किलो डाळ जप्त केली.

Food civil supply

भारत नगर दुर्गादेवी मंदिरासमोर राहणाऱ्या विनोद चौगले याच्या घरावर अन्न नागरी पुरवठा खात्याच्या अधिकारी सईदा आफ्रिना बानू आणि शहापूर पोलीस स्थानकाचे इन्सपेक्टर जावेद मुशापुरी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

 belgaum

सरकारी योजनेचा अन्न साठा साठवलेल्या विनोद चौगुले याला अटक करण्यात आली आहे.ए एस आय करेप्पा रामनगोळ,पोलीस आनंद खोत आणि यासीर जमादार यांनी कारवाईत भाग घेतला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.