Sunday, April 28, 2024

/

पीएसआय विरहित आयुक्तालय?

 belgaum

बेळगाव पोलीस आयुक्तालयाची अवस्था मनुष्यबळाच्या अभावामुळे बिकट झाली आहे. बेळगाव पोलीस आयुक्तालयात येणाऱ्या दहा ते अकरा पोलिस स्थानक्यांमधील जवळपास 15 ते 20 पीएसआय पदे रिक्त आहेत. बऱ्याच ठिकाणी सिपीआय ना त्या पदांचे काम पहावे लागत असून बंदोबस्त तपासणी इतर सगळा भार पडत आहे .
पोलीस आयुक्त याकडे दुर्लक्ष करत आले आहेत. रिक्त पदे भरण्यासाठी दुर्लक्ष झाल्यामुळे पोलिसांचा एकूणच कारभार चालणे अवघड आहे .पोलीस आयुक्त तसेच उपायुक्त आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे पद लवकर भरणे आवश्‍यक होते पण तसे झाले नाही .

बेळगाव शहराचा विस्तार वाढत आहे .पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही वाढ झाली आहे. पण पीएसआय नसेल तर काम कसे चालणार असा प्रश्न आहे. प्रामुख्याने बेळगावच्या संवेदनशील भागावर काम करणाऱ्या मार्केट पोलीस स्थानकात ही दोन पीएसआय आवश्यक आहेत. पण दोन्ही पदे रिक्त असल्यामुळे त्या ठिकाणी सीपीआयवर भार पडत आहे. माळमारुती पोलिसांचीही थोड्याबहुत प्रमाणे अशीच परिस्थिती असून तेथेही हीच अवस्था असल्याची माहिती मिळाली आहे.दोन्ही ठिकाणी सीपीआय पदाच्या अधिकाऱ्यांनी जास्त काम करावे लागत आहे.

Psi two stars

 belgaum

पीएसआय पदांमध्ये गुन्हेगारी आणि कायदा व सुव्यवस्था अशा दोन पदांवर भरती केली जाते. प्रत्येक पोलिस स्थानकात दोन पीएसआय असणे आवश्यक असते .पण हे दोन्ही नसले तर काम चालणे कठीण होते. त्याची जाणीव पोलीस आयुक्तांना झाली नाही का ?असा प्रश्न सध्या पोलिस विचारत आहेत .या गोष्टी पोलिस अधिकाऱ्यांनी व पोलिसांनी वरिष्ठांच्या निदर्शनाला आणून देखील पोलीस आयुक्त लक्ष देत नसल्यामुळे नाराजी आहे.
दुसऱ्या पदांचे काम आम्हीच करायचे का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.सध्या ए एस आय पदावर काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांचे काम करावे लागत आहे. पण ते पद आणि पगार मिळत नाही. फक्त कामाचा बोजा वाढवला जातो. त्यामुळे त्यांच्यात नाराजी आहे.

बेळगाव पोलीस आयुक्तालयाचा व्यवहार सुधारायचा असेल तर लवकरात लवकर भरती केली जाईल याकडे सरकार, गृहमंत्री पोलिस महासंचालक त्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी आहे.

बेळगाव शहरात चोऱ्यांचे घटना वाढताहेत. ठीक ठिकाणी घरफोड्या होत असताना पोलीस भरती वाढवण्याची चोरांमध्ये दरारा निर्माण होण्याची गरज असते. पण काम करणारे अधिकारी नसल्यामुळे या चोऱ्या कशा थांबवणार हा प्रश्न आहे. चोऱ्या दरोडे घरफोड्या थांबवायचे असतील लवकरात लवकर रिक्त पदे भरली जावीत अशी मागणी आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.