Thursday, January 2, 2025

/

व्हॉलीबॉल स्पर्धेत जे.एल.विंग संघ विजेता

 belgaum

ज्युनियर लिडर्स विंगतर्फे घेण्यात आलेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेत हेडक्वार्टर जे.एल.विंग संघाने विजेतेपद पटकावले.

J L  wing

अंतिम सामना हेडक्वार्टर जे.एल.विंग आणि पी .सी.विंग यांच्यामध्ये झाला.एकूण तीन सामन्यात हेडक्वार्टर जे.एल.विंग संघाने आपले वर्चस्व कायम राखून विजेतेपद पटकावले.

J l wing vollyball

पहिल्या सामन्यात हेडक्वार्टर जे.एल.विंग संघाने २५ गुण मिळवले तर पी.सी.विंगला २३ मिळाले.दुसऱ्या सामन्यात २५ तर तिसऱ्या सामन्यात २५ गुण हेडक्वार्टर जे.एल.विंगने मिळवले तर पी.सी.विंगने २२ आणि २३ असे गुण मिळवले.

दोन्ही संघांनी उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन घडवले.मेजर जनरल संजय सोई यांच्या हस्ते विजेत्या संघाना पुरस्कार वितरित करण्यात आले.यावेळी कर्नल विजय दधवाल,कर्नल प्रवीण कुमार,कर्नल राजू जॉर्ज ,लेफ्टनंट कर्नल बी.एस.वर्मा,समीर रैना,के.प्रभाकरन,मेजर ए.के.रौगी,जगदीप वसिष्ठ,,वेध अरविंद,प्रीतम कांबळे,सुभेदार मेजर रोशनलाल, आरती सोई, सौ.दधवाल,शिवानी रैना आदी मान्यवर उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.