भारतीय सेनेची शौर्याची गाथा सांगणाऱ्या दोन रणगाडे मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये दाखल झाले असून तळेकर ड्रिल स्क्वेअर येथे त्यांची स्थापना करण्यात आली आहे.
आता सैन्यात अत्याधुनिक रणगाडे दाखल झाल्यामुळे पूर्वी भारतीय सेनेच्या शक्तीचा कणा बनलेले हे रणगाडे सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांची स्थापना आता सेंटरमध्ये करण्यात आली आहे.
हे रणगाडे अत्यंत अवजड असल्यामुळे ते उतरवून ठरवलेल्या जागी ठेवणे आव्हानात्मक कार्य होते.हे रणगाडे उतरविण्यासाठी निविदा देखील मागविण्यात आल्या होत्या.पण आय.एन.पठाण यांनी एक रुपयाही न घेता आपल्या क्रेन मागवून रणगाडे व्यवस्थित उतरवून ठरवलेल्या जागेवर ठेवले.
आपल्याला रणगाडे उतरविण्याच्या निमित्ताने देश सेवा करण्याची संधी मिळते म्हणून त्यांनी पैसे घेण्याचे नाकारले.रणगाडे उतरविण्याच्या वेळी ब्रिगेडियर गोविंद कलवड यांच्यासह अधिकारी ,जवान उपस्थित होते.