पीएलडी बँकेच्या निवडणुकीवरून निर्माण झालेला वाद आणि जारकीहोळी ब्रदर्स आणि लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यातील संघर्षात राज्यातील काँग्रेसचे नेते हादरून गेले होते. आता कर्नाटक उच्च न्यायालयाने ही निवडणूक ७ सप्टेंबर च्या आत घेण्याचा आदेश दिला आहे.
जारकीहोळीनी आपले वजन वापरून ही निवडणूक पुढे ढकलली होती. याविरुद्ध लक्ष्मी यांनी धरणे आंदोलन पुकारले मात्र काहीच उपयोग झाला नाही तेंव्हा त्या कर्नाटक उच्च न्यायालयात न्याय मागण्यास गेल्या.
कालच त्यांनी आपण जारकीहोळीच्या विरोधात नाही असे स्पष्ट करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. पण आता न्यायालयीन लढ्यात जारकीहोळी गटाला हार पत्करावी लागली असल्याने पुन्हा संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत.
आता निवडणूक लवकर घ्यावीच लागणार असल्याने ती कोणत्याही राजकीय ताकदीवर रोखून धरता येणार नाही. येथूनच पुन्हा नव्या वादाची ठिणगी पेटण्याची शक्यता आहे.