Monday, December 23, 2024

/

‘माजी नगरसेवकावर चाकूने हल्ला’

 belgaum

शहराच्या उज्वल नगर भागात दोन गटात हाणामारी होऊन माजी नगरसेवकावर चाकूने हल्ला झाल्याने एक आजी एक माजी नगरसेवक जखमी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी उज्वल नगर भागात घडली आहे.

फिरदोस दर्गा आणि मतीन शेख असे जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत.फिरदोस यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला असून त्यांना उपचारासाठी के एल इस्पितळात उपचार सुरू आहेत तर अन्य एक नगरसेवक मतीन शेख हे देखील जखमी त्यांच्यावर सिव्हिल इस्पितळात उपचार सुरू आहेत.

Firdos matin ali

उज्वल नगर मधील माजी नगरसेवकाच्या अड्ड्या जवळ दोन गटात ही घटना घडली असून घटनास्थळी तणावाचे वातावरण होते याभागात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

सूत्रा कडून मिळालेल्या माहितीनुसार ऑटोनगर भागातील माळी मंच विवाह सोहळा होता त्या ठिकाणी विध्यमान नगरसेवकाच्या समर्थकात आणि माजी नगरसेवकांत किरकोळ वाद झाला होता त्यानंतर सायंकाळी उज्वल नगर भागात दोन गटात हाणामारी झाली यावेळी चाकूचा वापर करण्यात आला आहे या अगोदरही या दोघात पूर्व वैमनस्य होतं त्यामुळे अनेकदा उभयतांत खटके उडाले होते.मागील दोन वर्षापूर्वी काँग्रेस नेते सी एम इब्राहिम बेळगावला आले असता त्यांच्या समक्षच मतीन आणि फिरदोस यांच्यात जोरदार हाणामारी झाली होती त्या घटने नंतर पुन्हा या दोन गटात मारामारी झाली आहे.

माळ मारुती पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधीक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.