गणेशोत्सव संपताच साऱ्यांना वेध लागले ते नवरात्रोत्सवाचे. या नवरात्रोत्सवात नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येते. त्यामुळे सारे वातावरण चैतन्यमय असते. मूर्तिकार आता दुर्गामाता मूर्ती बनविण्याकडे वळले आहेत. त्यामुळे पुन्हा कुंभार शाळा गजबजू लागले आहेत.
यंदाच्या महापुरामुळे गणेशोत्सवावर दुष्काळाचे सावट पसरले होते. अनेक मंडळांनी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करून सामाजिक भान बाळगले होते. याच प्रमाणे या वर्षी देखील नवरात्र उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यासाठी मंडळे सज्ज झाले आहेत. काही मंडळांनी तर नवरात्र उत्सव करणार नसल्याचे ही माहिती उपलब्ध झाली आहे.
शहरातील विविध भागात नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याचबरोबर उपनगरी भागात आणि ग्रामीण भागातही हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. विशेष म्हणजे नवरात्रोत्सवात दुर्गामाता दौड हे साऱ्यांचे लक्ष घेणारे ठरते. दौंड ची तयारीही ही जोरदार सुरू असून अनेकांनी त्यासाठी आतापासून काम करण्यास सुरुवात केली आहे.
महापुराच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी उत्सवातील भव्यता मात्र कमी असणार आहे. विविध स्वरूपातील मूर्ती करण्याची मागणी मंडळांनी केली आहे. यंदा मात्र उत्सव साध्या पद्धतीने होणार असून पारंपारिक पद्धतीवर भर देण्यात येणार आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्र उत्सवाच्या तयारीला आता सारेच लागल्याचे दिसून येत आहे.