कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांचे भाजप सरकार आणि केंद्र सरकार यांना कर्नाटकातील पूरग्रस्तांना मदत देण्यात अपयशआल्याचा आरोप करत काँग्रेसने बेळगावात पदयात्रा काढत निषेध केला. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडूराव,माजी मंत्री एचके पाटील,आर व्ही देशपांडे, सतीश जारकीहोळी,सीएम इब्राहिम ईश्वर खंडरे यांच्या सह अनेक आमदारांनी सहभाग घेतला होता.
कर्नाटकात आलेल्या पुरानंतर एकीकडे मोदींनी रशियाला कर्ज दिले होते मात्र त्यांनी एक पैसा देखील पूरग्रस्तांना दिला नाही असा आरोप काँग्रेस नेत्याने या पदयात्रेत केला. एकीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडीयुराप्पा स्वतःला शेतकऱ्यांचे कैवारी समजतात इतकच असेल तर त्यांनी केंद्राकडून पूरग्रस्तांसाठी निधी आणून दाखवावा असा थेट आव्हान काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.
केवळ भाजपाच नव्हे तर भाजपाचे मास्टरमाइंड असलेले आरएसएस च्या नेत्यांनी देखील मोदी समोर उभा राहून दाखवावे आणि राज्याला पुरग्रस्तांना निधी आणून दाखवावा अशी टीका देखील काँग्रेस नेत्यांनी केली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली गृहमंत्र्यांनी हवाई पाहणी केली तर सीतारामन यांनी दौरा करून पाहणी केली होती मात्र केंद्राने अद्याप एक रुपये देखील निधी प्रस्ताव दिलेला नाही असा देखील आरोप काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आला.
आर टी ओ सर्कल जवळील काँग्रेस कार्यालयातुन पदयात्रेस सुरुवात झाली राणी चन्नम्मा चौकात सांगता झाली.येडीयुराप्पा हे देशातले सर्वात कुमकुवत मुख्यमंत्री बनले आहेत कारण गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान मोदी यांच्या ताटाखालचे मांजर बनले आहेत आजपर्यंतच्या कर्नाटकच्या इतिहासात इतका कमजोर मुख्यमंत्री जनतेने पाहिलेला नाही ते नेहमी अपात्र आमदार आणि सरकारला वाचवण्याच्या धडपडीत आहेत असा टोला त्यांनी लगावला.