Thursday, May 16, 2024

/

समितीचा कारवार लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार जाहीर

 belgaum

बेळगाव लाईव्ह: कारवार लोकसभा मतदार संघातून महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे निरंजन सरदेसाई यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून निवडणुकीच्या माध्यमातून समितीला पुन्हा नव्याने बळ मिळणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून बेळगाव आणि कारवार लोकसभा मतदार संघातून महाराष्ट्र एकीकरण समितीने निवडणूक लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यातून होत होती त्यानुसार दोन्ही ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

रविवारी खानापुर येथील शिवस्मारक येथे तालुका समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती .Mes karwar

 belgaum

अध्यक्षस्थानी गोपाळराव देसाई होते. यावेळी उमेदवारीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच लोकसभेच्या माध्यमातून मराठी भाषिकांची ताकद दाखवून देण्याचा निर्धार करण्यात आला. प्रारंभी सचिव आबासाहेब दळवी यांनी प्रास्तविक केले.

लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या रणजीत पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत निरंजन सरदेसाई याना जाहिर पाठींबा व्यक्त केला.
माजी तालुका पंचायत सदस्य पांडुरंग सावंत, गोपाळ पाटील, ऍड अरुण सरदेसाई, रमेश धबाले, रामचंद्र गावकर,

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.