Saturday, May 25, 2024

/

हायवेवर झालेल्या भीषण अपघातात ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू

 belgaum

बेळगाव लाईव्ह : शेतातील कोथंबीर मार्केटला घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या कॅन्टरने जोराची धडक दिल्याने दिलेल्या अपघातात ट्रॅक्टरचालक शेतकरी जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. रविवारी पहाटे 5: 30 वाजताच्या दरम्यान पुणे बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर हलगा येथे ही घटना घडली आहे.

मल्लाप्पा पारीस दंडकल्लणावर वय वर्ष 41 बस्तवाड (हलगा)असे मयत झालेल्या या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेत कॅन्टरने
चालक मात्र बचावला आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बस्तवाड(हलगा) येथून कोथिंबीर भरलेले ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास बेळगाव भाजी मार्केट कडे जात असताना हलगा येथे हायवेवर पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या महाराष्ट्र पासिंग असलेल्या कॅन्टरने जोराने धडक दिल्याने ट्रॉली एका बाजूला तर ट्रॅक्टर जवळजवळ 600 ते 700 फूट फरफटत नेला होता.

 belgaum

Tractor accident

कॅन्टरने ट्रॅक्टरला इतक्या वेगाने धडक दिली होती की ट्रॅक्टर चे तुकडे होऊन जवळपास 25 फूट उंचावरून सर्विस रोडच्या खाली ट्रॅक्टरचे अवशेष पडले होते. सकाळच्या वेळी सर्विस रस्त्यावरून यावेळी सुदैवाने कुणीही नसल्याने याचा फटका कुणालाही बसला नाही.

हा अपघात थरकाप उडवणारा होता की मयत ट्रॅक्टर चालकाच्या शरीराचे चार तुकडे झाले होते. सदर भयानक अपघात बघण्यासाठी ये जा करणाऱ्या लोकांची गर्दी झाली होती. सकाळी सकाळी हायवेवर ट्रॅफिक जाम सदृश्य स्थिती निर्माण झाली होती.

घटना कळताच हिर बागेवाडी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक हायवे पेट्रोलियम ची गाडी दहा मिनिटात घटनास्थळी दाखल झाली लागलीच क्रेन बोलवून हायवे वर पडलेले ट्रॅक्टरचे छोटे भाग व ट्रॅक्टर ड्रायव्हरचे झालेले सुट्टे भाग सर्व काही बाजूला काढत हायवेची वाहतूक सुरळीत करून दिली.हायवे पेट्रोलियम ला ड्युटीला असलेले एएसआय के आर गोनी आदी सहकाऱ्यांनी रहदारी सुरळीत केली.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.