Monday, June 17, 2024

/

मोबाईल दुकानात चोरी; लाखोंचे मोबाईल लंपास

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बारमध्ये चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांच्या हाताला काहींच न लागल्याने त्यांनी त्याच रस्त्यावरील मोबाईलचे दुकान फोडून लाखो रुपयांचे मोबाईल चोरून नेल्याची घटना काल रात्री गोकाक शहरात घडली.

गोकाक शहरातील एका बारमध्ये काल शुक्रवारी रात्री चोरी करण्यासाठी घुसलेल्या चोरट्यांना बारमध्ये पैसे अथवा मौल्यवान असे काहीही मिळाले नाही. त्यामुळे रिकाम्या हाताने परतलेल्या चोरट्यांनी त्याच रस्त्यावरील मोबाईल विक्री दुकान फोडले.

तसेच दुकानातील लाखो रुपये किमतीचे मोबाईल लंपास केले. काल रात्री उशिरा घडलेली ही घटना आज सकाळी उघडकीस येताच एकच खळबळ उडाली आहे.

 belgaum

चोरट्याने मोबाईल दुकान फोडल्याची माहिती मिळताच गोकाक शहर पोलीस श्वानपथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी करून चोरट्यांचा माग काढण्यास सुरुवात केली आहे.

अलीकडे गोकाकमध्ये वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे हैराण झालेल्या व्यावसायिकांकडून चोरट्यांना जेरबंद करण्याची जोरदार मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.