Friday, March 29, 2024

/

हट्टीहोळी, जारकीहोळी विधान परिषदेत : कवटगीमठ पराभूत

 belgaum

कर्नाटक विधान परिषदेच्या बेळगाव स्थानिक स्वराज्य मतदार संघातील अटीतटीच्या तिरंगी लढतीत अखेर काँग्रेस उमेदवार चन्नराज हट्टीहोळी आणि अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी यांनी बाजी मारली असून निर्विवाद विजय संपादन केला आहे. भाजपचे विद्यमान विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांना मात्र पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

विधान परिषदेच्या बेळगाव मतदार संघातील दोन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार चन्नराज हट्टीहोळी, भाजपचे विद्यमान विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ आणि अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी यांच्यात खरी तिरंगी लढत होती. यामध्ये चन्नराज हट्टीहोळी यांची सरशी झाली त्यांना सर्वाधिक 3718 मते पडली. लखन जारकीहोळी यांना 2526 मते घेऊन विजयी झाले असून महांतेश कवटगीमठ यांना 2456 मतांवर समाधान मानावे लागले. कवटगीमठ यांच्या पराभवामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.

चिकोडीच्या आर. डी. हायस्कूल येथील मतमोजणी केंद्रात निवडणुकीच्या मतमोजणीला आज दुपारी 12 वाजता प्रारंभ झाला. बेळगावच्या गुप्त मतदानातील 2 मतांचे प्रकटीकरण झाल्यामुळे ती मते बाद ठरविण्यात आली.Lakhan channraj

 belgaum

निवडणूक आयोगाने 1 भाजप आणि 1 अपक्ष मत फेटाळून लावली होती. मतदार संघातील अटीतटीच्या तिरंगी लढतीमुळे प्राधान्य मते गृहीत धरली जाणार असल्यामुळे निवडणूक निकालास विलंब होईल असे वाटत होते. जो उमेदवार एकूण मतांच्या 50 टक्के मते मिळवेल आणि ज्याला पहिले प्राधान्य मत मिळेल तो उमेदवार विजयी होणार होता.

जर तसे झाले नाही तर दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या या पद्धतीने प्राधान्य मतासाठी निकाल लागेपर्यंत मतमोजणी सुरूच राहणार होती, मात्र पहिल्याच फेरीत निवडणुकीचा निकाल लागला. उपरोक्त तिघा उमेदवारांवर अतिरिक्त आम आदमी पार्टीचे शंकर हेगडे, अपक्ष शंकर कुडसोमन्नावर व कल्मेश गाणगी हे अन्य तिघे उमेदवार निवडणूक रिंगणात होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.