Monday, July 15, 2024

/

अन्..त्याच्या चेहऱ्यावरील निराशा झाली दूर

 belgaum

बेळगाव लाईव्ह : कोणतीही महत्त्वाची हरवलेली वस्तू जर सापडली तर त्या माणसाचा आनंद गगनात मावेना सारखा होतो. बेळगावातील प्रमोद कोरटी यांना देखील याचीच प्रचिती आली.

झाले असे की त्यांचा ओप्पो कंपनीचा महागडा मोबाईल हरवला होता त्या मोबाईल मध्ये महत्त्वाचे कागदपत्रे होती त्यामुळे प्रमोद काहीसे सैरावैरा झाले होते मात्र आनंद डांगे या व्यक्तिमत्वाने त्यांच्या चेहऱ्यावरची निराशा गायब करत हसू आणले.

या घटनेबाबत समजलेली अधिक माहिती अशी की वडगाव विष्णू गल्ली येथे सापडलेला तब्बल पंचवीस हजार रुपये किंमतीचा मोबाईल आनंद डांगे यांनी प्रमोद कोरटी यांना परत केला त्यावेळी प्रमोद यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला.

एका कॉलेजमध्ये लायब्ररीयन म्हणून काम करत अनंत डांगे हे कामानिमित्त विष्णू गल्ली वडगाव येथे गेले होते तिथे त्यांना ओप्पो कंपनीचा पंचवीस हजार रुपये किमतीचा मोबाईल सापडला.प्रमोद यांनी हरवलेल्या मोबाईलवर फोन केला हरवलेल्या मोबाईल हा आनंद यांना सापडला आहे तुम्ही हा मोबाईल घेऊन जावा असे सांगितले.Mobile return

त्यानंतर सैरावैरा झालेले प्रमोद यांनी आनंद यांना सांगितले की मला मोबाईल पेक्षा मला त्यामधील डॉक्युमेंट महत्वाचे आहे माझी व्यवहारिक संपूर्ण माहिती यामध्ये आहे. तेव्हा तात्काळ चौकशी करून तसेच ओळख पटवून आनंद यांनी सुखरूप सुपूर्द मोबाईल प्रमोद यांना करण्यात आला .

हरवलेला आपला महागडा मोबाईल परत मिळाल्याने आनंदित झालेल्या प्रमोद यांनी कृतज्ञता व्यक्त करून आनंद डांगे यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.