Sunday, May 19, 2024

/

सिलेंडर स्फोटांनी हादरले ओल्ड गांधी नगर

 belgaum

गॅस सिलेंडर स्फोट होऊन चार जण जखमी झाल्याची घटना बेळगाव शहरातील जुन्या गांधीनगर परिसरातल्या सुभाष गल्ली येथे घडली आहे.

शनिवारी सकाळी सातच्या सुमारास गांधी नगर सुभाष गल्लीत मध्ये झालेल्या या सिलेंडर पोटात पती-पत्नीसह दोन मुले जखमी झाली असून त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनास्थळावरून समजलेल्या अधिक माहितीनुसार सुभाष गल्ली येथील मंजुनाथ अथणी आणि त्यांची पत्नी लक्ष्मी अथणी हे दांपत्य या घटनेत गंभीर रित्या जखमी झाले आहेत तर त्यांची मुलं देखील जखमी झालेल्या आहेत जखमींना उपचारासाठी के एल ई इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

 belgaum

मंजुनाथ अथणी हे बेळगाव शहरातील के एल सोसायटी मध्ये नोकरी करतात. शनिवारी ते सकाळी नोकरीला जात असताना चहा बनवण्यासाठी त्यांनी गॅस चालू करताना त्यांनी लाइटर दाबल्यानंतर हा सिलेंडर स्फोट झाला.

या घटनेत चार जण जखमी झाले आहेत माळमारुती मध्ये पोलीस स्थानकात याप्रकरणी दाखल करण्यात आली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.