Tuesday, November 5, 2024

/

“ॲग्री किसान ड्रोन” करणार शेत पिकांची फवारणी

 belgaum

शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना बेळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या पिकांवर रासायनिक खतांची फवारणी करण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. याचे प्रारंभीचे प्रात्यक्षिक बेळगाव तालुक्यातील कडोली गावात नुकतेच पार पडले.

देशात “ॲग्री किसान ड्रोन”चे उत्पादन करणारी गरुडा एरोस्पेस ही नामांकित कंपनी इफ्को या खत उत्पादक कंपनीच्या समन्वयातून आपला हा ड्रोनद्वारे खत फवारणीचा पहिला पथदर्शी प्रकल्प राबवत आहे.

ड्रोन चालक पायलट अश्विन याच्यासह चेन्नई येथील गरुडा एरोस्पेसच्या पथकाने काल गुरुवारी ॲग्री किसान ड्रोनच्या सहाय्याने कडोली येथील उसाच्या पिकावर हवेतून खताच्या फवारणीचे प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना ड्रोन पायलट अश्विन म्हणाले की, शेत पिकांवर रासायनिक खतांची फवारणी करण्यासाठी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. प्रति एकर रासायनिक खतांची फवारणीसाठी फक्त 10 लिटर पाणी लागते. यामुळे खत आणि पाण्याची बचत होण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या वेळेचीही बचत होते. आम्ही ड्रोनद्वारे रासायनिक औषध फवारणीचे हे प्रात्यक्षिक संपूर्ण कर्नाटकामध्ये करत असून हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना अवगत करून दिले जात आहे.Drone

कडोली येथील शेतकरी रमेश मायान्ना म्हणाले की, ड्रोनच्या सहाय्याने इतक्या सहज आणि सुलभरीत्या संपूर्ण पिकाला खत देता येते हे पाहून आम्हाला अतिशय आनंद झाला आहे. यामुळे आमचे मोठे परिश्रम आणि वेळ वाचणार आहे. जर ड्रोनच्या सहाय्याने सध्या उसावर केलेल्या खत फवारणीचे परिणाम उत्तम निघाले तर आम्ही इतर सर्व पिकांवर ड्रोनच्या सहाय्यानेच खत फवारणी करणार आहोत.

आम्ही इफ्को कंपनीच्या डेप, युरिया यासारख्या नॅनो खतांचा वापर करत आहोत. कडोली येथे गरुडा एरोस्पेसच्या तंत्रज्ञांनी सादर केलेले ड्रोनद्वारे हवेतून पिकांवर खत फवारणी करण्याचे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी उमेश देसाई, संभाजी बाळाराम मायान्ना, सुरेश पाटील, मंजुनाथ गडकरी, अभिजीत मास्तमर्डी आदी बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.