belgaum

भारत सरकारच्या डायरोक्टरेट जनरल सिव्हिल एव्हिएशन (डीजीसीए) यांनी नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार गेल्या एप्रिल -2023 मध्ये बेळगाव विमान तळावरून एकूण 18,900 प्रवाशांनी हवाई प्रवास केला आहे.

सदर माहिती प्रसिद्ध करण्याबरोबरच डीजीसीएने बेळगाव विमानतळाच्या सर्व नऊ प्रवासी वाहतूक मार्गांपैकी प्रवाशांची सर्वाधिक गर्दी बेंगलोर -बेळगाव मार्गावर होती हे नमूद केले आहे. एप्रिल महिन्यात बेळगाव -बेंगलोर हवाई प्रवासाचा 7527 प्रवाशांनी लाभ घेतला आहे.

तसेच याच महिन्यात बेळगाव -बेंगलोर दरम्यान 0.8 टन इतकी कार्गो वाहतूक झाली आहे. स्टार एअरलाइन्सने अलीकडेच बेळगाव येथून अहमदाबाद, इंदोर, जोधपुर, जयपुर, मुंबई, नासिक, सुरत, तिरुपती आणि नागपूर अशा देशातील 8 प्रमुख शहरांना आपली विमानसेवा उपलब्ध करून दिली आहे.

याव्यतिरिक्त इंडिगो एअरलाइन्स बेळगाव येथून बेंगलोरला दोन विमान सेवा तर हैदराबादला एक विमान सेवा देत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.