belgaum

कर्नाटक राज्यातील प्रत्येक घराला 200 युनिट वीज मोफत देणाऱ्या ‘गृह ज्योती’ योजनेसाठी सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लाभार्थींसाठी अर्ज करण्याकरिता येत्या 15 जूनपासून ते 15 जुलै 2023 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

राज्यातील प्रत्येक घराला 200 युनिट मोफत विजेची ‘गृह ज्योति’ योजना येत्या 1 ऑगस्टपासून राज्यभरात लागू होणार आहे. सदर योजना फक्त घरगुती वापराच्या विजेसाठी लागू असणार आहे.

स्वतःचे घर असो किंवा भाड्याचे घर असो, करार पत्र अनिवार्य असणार आहे. गृह ज्योति योजनेचा लाभ सेवा सिंधूच्या माध्यमातून घेता येतो. तसेच यासाठी वीज खात्यातर्फे नवे मोबाईल ॲप तयार करण्यात येत असून येत्या दहा-पंधरा दिवसात ते तयार होईल. भाडेकरू आणि मालक त्याद्वारे अर्ज करू शकतात गृह ज्योति योजनेअंतर्गत 200 युनिट पर्यंत मोफत व वीज मिळण्यासाठी भाडेकरूंनी भाड्याच्या घराच्या पत्त्यासह आधार कार्ड असल्यास भाडे पत्र सादर करणे बंधनकारक नाही.

परंतु आधार कार्डमध्ये भाड्याच्या घराचा पत्ता नसल्यास भाडेकरार पत्र सादर करणे अनिवार्य आहे. गृह ज्योती सुविधेच्या लाभार्थीने त्यांचे आधार कार्ड आणि ओळखपत्र मीटर क्रमांकाशी लिंक करावे. सरकारकडून स्वतःचे घर असलेल्या सर्वांना आणि भाड्याच्या घरांना 200 युनिट पर्यंत मोफत वीज दिली जाणार आहे.

सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी सेवा सिंधू पोर्टल किंवा गृह ज्योती ॲपद्वारे 15 जूनपासून 15 जुलैपर्यंत अर्ज करता येतील. सर्व ॲप ‘प्ले स्टोअरवर’ उपलब्ध असतील. ॲप डाऊनलोड करून अर्ज दाखल करावा.

भाडेकरूंनी आधार कार्ड भाडे करार पत्र आणि विज संयंत्रांचा आयडी क्रमांक असलेले बिल दाखल करावे. ॲपमध्ये लॉगिन करा आणि ‘ऑप्ट इन’ पर्याय दाबा. त्यानंतर तुमचे दस्तावेज तेथे अपलोड करा. जर तुम्ही दोन महिन्यात भाड्याचे घर रिकामे केले असेल आणि दुसऱ्या घरात गेलात तर तुम्ही पुन्हा ॲपवर लॉगिन करून ऑप्ट इन पर्याय निवडून संबंधित कागदपत्रांसह अर्ज केला पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.