belgaum

कॅम्प, उद्यमबाग येथे दोघा मटका बुकिंना अटक

0
Police logo
 belgaum

बेळगाव लाईव्ह :कॅम्प आणि उद्यमबाग येथे सार्वजनिक ठिकाणी मटका जुगार आवर लोकांचे पैसे लावणाऱ्या दोघा मटका बुकिंना काल पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडील जुगाराचे साहित्य जप्त केले.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे साहिल रघु खोरागडे (वय 25, रा. ज्योतीनगर, बेनकनहळ्ळी) आणि उदय देविदास नाईक (वय 50, रा. राजारामनगर, उद्यमबाग) अशी आहेत. यापैकी साहिल हा कॅम्प येथील फातिमा चर्च जवळील हाजीपीर रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी मटक्याचे आकडे घेऊन लोकांचे पैसे जुगारात लावत होता.

त्यावेळी कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बी. व्ही. करोशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाड टाकून त्याला अटक केली. तसेच त्याच्या जवळील जुगाराचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

 belgaum

दुसऱ्या प्रकरणात उदय नाईक हा राजाराम नगर येथील केमिकल फॅक्टरी जवळ सार्वजनिक ठिकाणी मटक्याचे आकडे घेऊन लोकांचे पैसे जुगारात लावत होता. त्यावेळी उद्यमबाग पोलिसांनी धाड टाकून त्याला रंगेहात पकडून त्याच्या जवळील जुगाराचे साहित्य जप्त केले.

पोलीस चौकशीत उदया याने जुगारात जमा झालेले पैसे आपण दुसरा आरोपी दिनेश दिलीप दोडमनी (रा. ब्रह्मनगर, उद्यमबाग) याच्याकडे सुपूर्द करत होतो अशी माहिती दिली. त्यामुळे दोघांविरुद्धही उद्यमबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.