belgaum

शहर समितीचे माजी अध्यक्ष टी. के. पाटील यांचे निधन

0
 belgaum

बेळगाव : मूळचे कडलगे चंदगड तालुका येथील सध्या टीचर्स कॉलनी हिंडलगा येथे वास्तव्यास असलेले बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी अध्यक्ष टी. के. पाटील (वय 77) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगा, मुली, सून-जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. शुक्रवारी सकाळी 9: 30 वाजता सदाशिवनगर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

टी. के. पाटील हे उत्तम पी.ई. (शारीरिक शिक्षण) शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले होते. शिक्षक संघटनेतही त्यांनी अनेक वर्षे सक्रियपणे काम केले.

बेळगाव सीमा प्रश्नाच्या चळवळीत त्यांनी माजी आमदार कै. राजाभाऊ माने यांच्यासोबत अनेकदा सहभाग नोंदवला. 2008 ते 2013 या कालावधीत त्यांनी शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्षपद भूषवले. त्या काळात सीमा प्रश्नासंदर्भात अनेक शिष्टमंडळांचे नेतृत्व त्यांनी केले.

 belgaum

आजातशत्रू व्यक्तिमत्त्व, संघटन कौशल्य आणि सामाजिक बांधिलकी यामुळे त्यांची ओळख होती. तसेच, पूर्वीच्या काळात ते उत्कृष्ट कबड्डीपटू म्हणूनही प्रसिद्ध होते.सीमा लढ्यातील अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची छाप होती.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.