Thursday, May 2, 2024

/

1 मार्चपासून परिवहन कर्मचारी संपावर?

 belgaum

परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आठ तास कामासह 20 टक्के वेतन वाढ या आपल्या मागणांसाठी येत्या 1 मार्चपासून संप पुकारून आंदोलन छेडण्याची तयारी सुरू केली आहे. राज्यातील चारही परिवहन महामंडळाचे कर्मचारी या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

दर चार वर्षातून एकदा परिवहन कर्मचाऱ्यांना वेतन वाढ दिली जाते. मात्र यावेळेस 6 वर्षे उलटली तरी कर्मचाऱ्यांना वेतन वाढ मंजूर झालेले नाही. नियमाप्रमाणे गेल्या मार्च 2020 मध्ये ही वेतन वाढ होणे आवश्यक होते.

आता मूळ वेतनासह भत्त्यावर 20 टक्के वेतन वाढ दिली जावी. तसेच फॉर्म 4 ची अंमलबजावणी कर्मचाऱ्यांना केवळ 8 तास काम द्यावे अशा परिवहन कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.

 belgaum

या मागण्यांच्या पूर्ततेसाठी गेल्या 24 जानेवारी रोजी परिवहन कर्मचाऱ्यांनी सांकेतिक आंदोलन केले होते. तत्पूर्वी एप्रिल 2021 मध्ये 15 दिवसांचा संपही पुकारला होता. या काळात परिवहनची सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती.

त्यावेळी शासनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची हमी दिली होती. मात्र त्याची अद्याप पूर्तता झालेली नाही. त्यासाठी 24 जानेवारीला सांकेतिक आंदोलन करण्यात आले. तरीदेखील शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने परिवहन कर्मचाऱ्यांनी येत्या 1 मार्चपासून आंदोलन करण्याची तयारी सुरू केली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.