Thursday, April 18, 2024

/

इंडीयन बॉईज,आर्मी,चॉईस यमकनमर्डी,श्री स्पोर्ट्स संघाचे विजय

 belgaum

बेळगाव येथील सरदार मैदानावर सुरू असलेल्या आमदार अनिल बेनके ऑल इंडिया टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यांमध्ये इंडीयन बॉईज,आर्मी,चॉईस यमकनमर्डी,श्री स्पोर्ट्स या संघाने प्रतिस्पर्धी संघावर मात करत पुढील फेरीत प्रवेश केला आहे.

रविवारी सकाळी झालेल्या पहिल्या सामन्यात बेळगावच्या इंडियन बॉईज संघाने लकी स्पोर्ट्स संघावर पाच गड्यांनी विजय मिळवला निर्धारित दहा षटकांमध्ये लकी स्पोर्ट्स संघाने 108 धावा केल्या शेवटचा एक चेंडू शिल्लक असताना रंगलेल्या या सामन्यांमध्ये लकी स्पोर्ट्स ने 9.5 ओव्हर मध्ये 112 धावा करत पाच गडी राखून विजय मिळवला.

सामन्यात आर्मी इलेव्हन संघाने नंदगड ग्रामीण संघावर सहा गड्यांनी विजय मिळवला नंदगड ग्रामीण संघाने निर्धारित 10 षटकात 58 धावा केल्या त्याला प्रत्युत्तर देताना आर्मी इलेवन संघाने 6.2 ओव्हर्स मध्ये 59 धावा करत आरामात विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात चॉईस इलेव्हन यमकनमर्डी या संघाने राजस्थानी युथ क्लब बेळगावचा चार गड्यांनी पराभव केला राजस्थानी युथ क्लब ने निर्धारित दहा षटकात 100 धावा केल्या.चॉईस इलेव्हन यमकनमर्डी संघाने 9.3 चेंडूत तीन चेंडू शिल्लक असताना 106धावा करत चार गडी राखून विजय मिळवला.Cricket sardar ground

 belgaum

रविवारी झालेल्या चौथ्या शेवटच्या सामन्यांमध्ये श्री स्पोर्ट्स ने वी सी सी संघाचा सहा गडी राखून पराभव केला.वी सी सी संघाने दहा षटकात 83धावा बनवल्या होत्या त्याला प्रत्त्युत्तर देताना श्री स्पोर्ट्स ने 7 ओवर्स 3 चेंडूत 84धावा करत सहा गडी राखून विजय मिळवला. रविवारी झालेल्या चारही सामन्यांमध्ये प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवले.

उद्या सोमवारी सकाळच्या सत्रात वाजता बेळगाव वॉरियर्स विरुद्ध एच सी व्ही, चॉईस एलेवन विरुद्ध एस आर एस हिंदुस्तान दुपारी कॉलेज बॉईज खानापूर विरुद्ध एस एस एस फाउंडेशन कणबर्गी तर पहिल्या आणि चौथा सामन्यातील विजेत्या संघा विरुद्ध सामने होणार आहेत.

सरदार मैदानावर आमदारांनी बनके आयोजित ऑल इंडिया लेवल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून रविवारी शेकडो प्रेक्षकांनी सामने पहाण्यासाठी गर्दी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.