बेळगाव लाईव्ह :हेरॉईन या अंमली पदार्थाच्या विक्रीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या एका संशयिताला बेळगाव दुसरे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.
जामीन मिळालेल्या संशयिताचे नांव महादेव गजानन पाटील (रा. कंग्राळी के.एच.) असे आहे. हेरॉईन विक्री करत असल्याच्या संशयावरून सीसीबी पोलिसांनी 27 डिसेंबर 2025 रोजी त्याला ताब्यात घेतले होते. तसेच त्याच्याकडून 5 ग्रॅम हेरॉईन जप्त केले होते. त्यानंतर त्याच्याविरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये एपीएमसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, संशयिताच्यावतीने न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावर सुनावणी झाल्यानंतर दुसरे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने 1 लाख रुपयांचे हमीपत्र,
तसेच तितक्याच रकमेचे दोन जामीनदार सादर करणे, साक्षीदारांना कोणतीही धमकी देऊ नये, पुन्हा अशा प्रकारच्या गुन्ह्यात सहभागी होऊ नये, अशा अटींवर जामीन मंजूर केला आहे.
संशयिताच्यावतीने अॅड. मारुती कामाण्णाचे हे काम पाहत आहेत.





