Saturday, November 9, 2024

/

रवी कोकितकर यांच्यावर पूर्व वैमस्यातूनच गोळीबार, अभिजीत भातकांडे सह तिघे अटकेत

 belgaum

हिंदुत्ववादी कार्यकर्ते श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष रवी कोकितकर यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा 24 तासाच्या आत पर्दाफाश करण्यात बेळगाव पोलिसांना यश आले असून वैयक्तिक द्वेष आणि आर्थिक व्यवहारातून गोळीबार झाल्याचे कारण समोर आले आहे. या प्रकरणी बेळगाव पोलिसांनी तिघांना अटक केली असून अभिजीत भातकांडे या बेळगावच्या युवकाने गोळीबार केल्याचे समोर आले आहे.

शनिवारी सायंकाळी झालेल्या गोळीबाराच्या घटने नंतर पोलीस आयुक्त डॉ एम बी बोरलिंगय्या यांनी केवळ चार तासातच विशेष पथकाची स्थापना करत या प्रकरणी तिघांना अटक केल्याची माहिती रविवारी दुपारी पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषदेत दिली .

अभिजीत सोमनाथ भातकांडे वय 41 रा. पाटील मळा बेळगाव यांच्यासह राहुल निंगाणी कोडचवड वय 32रा. संभाजी गल्ली बस्तवाड जोतिबा गंगाराम मूतगेकर वय 32रा.,संभाजी गल्ली बस्तवाड हलगा अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेतAbhijit bhatkande

शनिवारी सायंकाळी हिंडलगा जवळ कॅम्प पोलीस स्थानकाच्या हद्दीत  7:45 वाजता कोकीतकर यांच्यावर गोळीबार झाला होता त्यात हनुवटीला गोळी घासून गेल्याने ते जखमी झाले होते उपचारासाठी त्यांना खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते वैयक्तिक द्वेषातून ही घटना झाल्याने या गोळीबाराला राजकीय संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

रवी कोकितकर त्यांच्या गाडीचे चालक आणि मित्रासह हिंडलगा येथील घराकडे जात होते त्यावेळी तिघांनी मोटार सायकली वरून पाठलाग करत रस्त्यावरून गोळीबार केला त्यात रवी कोकितकर यांच्या मानेला वाहन चालकाच्या हाताला गोळी लागली त्यानंतर ते स्वतः होऊन उपचारासाठी इस्पितळात दाखल झाले होते

Ravi kokitkar

अभिजीत भातकांडे यांच्यासह तिघांना पोलिसांनी अटक केली असून अभिजीत भातकांडे आणि रवी कोकितकर यांच्यात पूर्ववैमनस्य होते काल झालेल्या गोळीबाराला पूर्व वैमनस्य कारणीभूत असल्याचे समोर आले आहे.दोन वर्षापूर्वी रवी कोकीतकर यांनी अभिजीत भातकांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता त्यावेळी शहापूर पोलिसात गुन्हा देखील नोंद आहे.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.