belgaum

कोट्यवधींच्या कथित गैरव्यवहाराचा तपास आता सीआयडीकडे

0
399
 belgaum

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील ‘शिवम असोसिएट्स’चे सर्वेसर्वा शिवानंद नीलण्णवर यांच्या साम्राज्यावर प्रशासनाने मोठी कारवाई करत त्यांची तीन कार्यालये आणि फ्लॅट्स सील केले आहेत.

आरबीआय आणि सेबीच्या कोणत्याही नियमांचे पालन न करता, बेकायदेशीरपणे सुमारे ३५ हजार गुंतवणूकदारांकडून २,५०० ते ४,५०० कोटी रुपये जमा केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून याचा तपास आता सीआयडीकडे सोपवण्यात येणार असून, उद्या सीआयडीचे विशेष पथक बेळगावात दाखल होत आहे.


गुरुवारी रात्री प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नीलण्णवर यांच्या मालमत्तांवर धाडी टाकून कार्यालयातील कॉम्प्युटर, लॅपटॉप आणि शेकडो कोटींचे बाँड पेपर जप्त केले आहेत.

चौकशीदरम्यान नीलण्णवर यांची चार बँक खाती गोठवण्यात आली असून, त्यात ४०० कोटी रुपये जमा असल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र, उर्वरित हजारो कोटींची रक्कम नेमकी कुठे वळवण्यात आली, याचा शोध आता प्रशासन घेत आहे. विशेष म्हणजे, इतक्या मोठ्या प्रमाणावर होणारी आर्थिक उलाढाल यंत्रणांच्या नजरेस कशी पडली नाही, यावरूनही आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.


चौकशीचा हा फास आवळला जात असल्याचे लक्षात येताच, शिवानंद नीलण्णवर याने एक ऑडिओ क्लिप व्हायरल करून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. “मी घरीच असून दोन-तीन दिवसांत प्रश्न सोडवीन,” असा दावा त्याने या क्लिपमधून केला आहे. मात्र, प्रशासनाने त्याच्यावर कडक निगराणी ठेवली असून सध्या त्याला शिवबसवनगरमधील निवासस्थानी पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे.

 belgaum

फसवणुकीची ही व्याप्ती मोठी असल्याने माळमारुती पोलीस आणि महसूल विभाग या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून, लवकरच यातील अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.