Wednesday, April 24, 2024

/

मराठी फलकाबाबत परिवहन अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे आश्वासन

 belgaum

बेळगाव बस स्थानकाच्या फलकावर मराठी भाषेला स्थान देण्याबाबत बापट गल्ली येथील कालिका देवी युवक मंडळाला उत्तरच्या आमदारांनी आश्वासन दिले आहे.

रविवारी बापट गल्ली येथील कालिकादेवी युवक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार अनिल बेनके यांची भेट घेऊन नुकताच उदघाटन झालेल्या नूतन केंद्रीय बस स्थानकाच्या फलकावर मराठीला स्थान देण्याची विनंती केली त्यावेळी आमदार अनिल बेनके यांनी निवेदनाचा स्वीकार करत याबाबत आपण परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊ असे आश्वासन दिले आहे.

बेळगाव बस स्थानकाच्या फलकावर केवळ कन्नड आणि इंग्रजी भाषेत फलक लावण्यात आला आहे बेळगाव शहर हे सीमा वरती भागातलं मुख्य केंद्रबिंदू असल्याने गोवा महाराष्ट्र मराठी भाषकांची ये जा असते याशिवाय स्थानिक मराठी भाषिक देखील मोठ्या संख्येने आहेत त्यांची देखील गैरसोय होत आहे. भाषिक अल्पसंख्यांक कायद्याच्या अधिकारानुसार मराठीत फलक लावणे गरजेचे आहे मराठीत फलक नसल्याने मराठी फरक नसल्याने त्रास होत आहे.Mla benke kalika devi yuvak mandal

 belgaum

आगामी दोन दिवसांत बेळगावचे जिल्हाधिकारी आणि परिवहन अधिकाऱ्यांशी बैठक घेऊ असे आश्वासन त्यांनी दिले आहे

या वेळी परिवाहन मंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत आणि बैठक घेण्याचे आ्वासन आमदारांनी दिले.
यावेळी मंडळाचे सुनील मुरकुटे, महादेव केसरकर,महेश पावले, अतुल केसरकर,धनंजय कणबरकर, प्रकाश राऊत आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.