belgaum

आजपासून इंधनाच्या दरात 3 रु. प्रति लिटरची वाढ; ‘अशी’ असेल दरवाढ

0
320
Petrol-Diesel-price
 belgaum

 belgaum

बेळगाव लाईव्ह : सर्वसामान्यांना पुन्हा महागाईचा फटका बसला असून केंद्र सरकारने आज 15 मेपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 3 रुपयांची वाढ जाहीर केली आहे. पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे जागतिक कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होत असल्याने आणि तेल विपणन कंपन्यांवरील आर्थिक ताण वाढल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

दरवाढीनंतर बेळगावात पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.02 रुपये तर डिझेलचा दर 93.99 रुपये इतका झाला आहे. नव्या दरांची अंमलबजावणी आजपासून तात्काळ करण्यात आली असून देशभरातील नागरिकांना वाढीव दराने इंधन खरेदी करावे लागणार आहे.

केंद्र सरकारकडून करण्यात आलेली ही दरवाढ गेल्या जवळपास चार वर्षांतील पहिली मोठी किरकोळ इंधन दरवाढ मानली जात आहे. अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत चर्चा सुरू होती. अखेर शुक्रवारी सरकारने दरवाढ जाहीर करत सर्व अटकळांना पूर्णविराम दिला.

 belgaum

देशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे नवे दर पुढीलप्रमाणे आहेत :
नवी दिल्ली – 97.77 रुपये,
मुंबई – 106.64 रुपये,
कोलकाता – 108.74 रुपये,
चेन्नई – 103.90 रुपये,
बेंगळुरू – 106.17 रुपये,
हैदराबाद – 110.89 रुपये,
जयपूर – 108.19 रुपये,
पाटणा – 108.55 रुपये प्रतिलिटर.

दरवाढीमागे जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती हे मुख्य कारण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. पश्चिम आशियातील संघर्षामुळे ऊर्जा पुरवठा साखळीवर ताण निर्माण झाला असून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर सातत्याने वाढत आहेत. यामुळे तेल कंपन्यांचा उत्पादन आणि वितरण खर्च वाढला असून त्याचा थेट परिणाम इंधन दरांवर झाला आहे.

दरम्यान, पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता असून त्याचा परिणाम भाजीपाला, जीवनावश्यक वस्तू आणि सार्वजनिक वाहतुकीच्या दरांवरही होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.