belgaum

ताजिकिस्तान येथे नुकत्याच पार पडलेल्या 11 व्या आशियाई वरिष्ठ कुराश अजिंक्यपद स्पर्धेत बेळगावच्या मलाप्रभा जाधव हिने सुयश मिळविताना कांस्य पदक हस्तगत केले आहे.

दुशनबे ताजिकिस्तान येथे गेल्या 17 ते 21 मार्च या कालावधीत 11 व्या आशियाई वरिष्ठ कुराश अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत 20 देशांचा सहभाग होता.

या स्पर्धेतील मुलींच्या 48 किलो वजनी गटात बेळगावच्या मलप्रभा जाधव हिने चमकदार कामगिरी नोंदविली. मलप्रभा हिने चार लढती जिंकून कांस्य पदकाचा बहुमान पटकावला. आपल्या चार लढतींमध्ये तिने अनुक्रमे ताजिकिस्तान, चायनीज ताईपाई, इराण आणि उझबेकिस्तानच्या कुराशपटुना पराजित केले.Malprabha

मलप्रभा जाधव हिने यापूर्वी राज्य आणि राष्ट्रीयस्तरावर अनेक पारितोषिके मिळवली आहेत. गेल्याच आठवड्यात तिने राष्ट्रीय पातळीवरील कुराश स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी नोंदविली होती. आता बेळगावचा नांव लौकिक आणखी वाढवताना तिने वरीलप्रमाणे आशियाई स्पर्धेत सुयश मिळविले आहे.

मलाप्रभाला आई-वडिलांचे प्रोत्साहन तसेच प्रशिक्षक त्रिवेणी एम. एन. आणि जितेंद्र सिंग तसेच फिटनेस कॉच ओमकार मोटार यांचे मार्गदर्शन लाभत आहे. उपरोक्त यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.