Monday, April 29, 2024

/

फुलांच्या उधळणीने प्रदूषणमुक्त रंगपंचमी उत्साहात

 belgaum

सालाबादप्रमाणे नवी गल्ली, शहापूर येथील कै.नारायणराव गुंडोजी जाधव सामाजिक आणि शैक्षणिक प्रतिष्ठानच्यावतीने प्रदूषणमुक्त रंगपंचमी उत्साहात साजरा करण्यात आली. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक, गणेशपूर गल्ली गाडेमार्ग कार्नर येथे रंगीबेरंगी फुले उधळून उपस्थित नागरिक आजी -माजी नगरसेवक आणि पोलीस अधिकाऱ्यांनी रंगपंचमीचा आनंद सुटला.

कार्यक्रमाच्या सुरवातीस प्रतिष्ठानच्यावतीने अध्यक्ष माजी महापौर मालोजी अष्टेकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रतिष्ठानच्या उपक्रमांची माहिती दिली.

माजी नगरसेवक नेताजी जाधव यांनी मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. याप्रसंगी नगरसेवक नितिन जाधव सामाजिक कार्यकर्ते संजय किल्लेकर यांनी शुभेच्छा दिल्या.Eco friendly holi

 belgaum

कार्यक्रमास उपस्थित पोलीस अधिकारी डीसीपी रवींद्र गडादी आणि एसीपी नारायण बरमणी यांनी प्रत्येकाने आपापले सण शांततेत साजरे करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन केले. तसेच प्रदूषणमुक्त रंगपंचमी उपक्रमाचे कौतुक करून जाधव प्रतिष्ठानला धन्यवाद दिले.

याप्रसंगी धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते गोपाळराव बिर्जे, एलआयसीचे घाडी, सतिश गावडोजी, सुधीर कालकुंद्रीकर, प्रभाकर भाकोजी, नगरसेवक रवि साळुंखे, माजी नगरसेवक विजय भोसले, राजू बिर्जे, सौ व श्री मनोहर हलगेकर, श्रीमती सुधा भातकांडे, वर्षा आजरेकर आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीधर उर्फ बापू
जाधव यांनी आभार मानले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.