आगामी कर्नाटक मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर माजी जलसंपदामंत्री आणि गोकाकचे विद्यमान आमदार रमेश जारकीहोळी हे तातडीने दिल्लीला रवाना झाल्यामुळे माध्यमात मंगळवारी हा चर्चेचा विषय झाला आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांचा हा दिल्ली दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. दिल्लीला जाण्यासाठी ते मंगळवारी सकाळी सांबरा विमानतळावर दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीमध्ये जारकीहोळी हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचे देखील बोलले जात आहे.
मंत्रिमंडळाची पुनर्रचना आणि गुढी पाडव्यानंतर होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये समाविष्ट होण्याबद्दल ते अमित शहा यांच्याशी चर्चा करणार आहेत. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.
त्या मंत्रिमंडळ विस्तारात आपली वर्णी लागावी यासाठी आमदार रमेश जारकीहोळी दिल्लीला रवाना झाले आहेत. एकंदर घडामोडी पाहता जाकीहोळी यांची मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता दाट शक्यता वर्तवली जात आहे.
कत्ती आणि जारकीहोळी बंधूंच्या गुप्त बैठका सुरू असल्याने बेळगाव जिल्ह्यातील राजकारण कुणीकडे वळण घेत आहे याबद्दल सध्या चर्चा रंगली आहे कत्ती आणि जारकीहोळी बंधूंचा त्यांच्या बैठकांमुळे लक्ष्मण काय करणार याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.