बस स्थानकं उभारून देण्याचे “या” आमदारांचे मोहन मोरे यांना आश्वासन

0
 belgaum

बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील बसने जाणाऱ्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी असून बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी आपल्या आमदार निधीतून ग्रामीण भागातील जनतेच्या सोयीसाठी 2 बस स्थानके उभारण्याचे आश्वासन जि. पं. सदस्य मोहन मोरे यांना दिले आहे.

बेळगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील समस्यांसंदर्भात जि प सदस्य मोहन मोरे यांनी रविवारी सकाळी बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांची भेट घेऊन चर्चा केली. याप्रसंगी आमदार बेनके यांनी मोहन मोरे यांना उपरोक्त आश्वासन दिले आमदारांशी झालेल्या चर्चेप्रसंगी जि. पं. सदस्य मोहन मोरे यांनी बेळगाव तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील लोकांसाठी शहरांमध्ये बसस्थानकाची सोय नसल्याची बाब प्रामुख्याने आमदारांच्या निदर्शनास आणून दिली.

bg
Mohan more benke
Mohan more benke

तालुक्यातील ग्रामीण भागासाठी असलेल्या बस थांब्याच्या ठिकाणी कोणताही आसरा नसल्यामुळे गावाकडे जाणाऱ्या लोकांना उन्हातान्हात व पावसात भिजत बसची प्रतीक्षा करावी लागते. साधी बसण्याचीही सोय नसल्यामुळे लोकांना ताटकळत थांबावे लागते. गेल्या अनेक वर्षापासून या पद्धतीने ग्रामीण भागातील लोकांची गैरसोय होत असल्याचे सांगून मोहन मोरे यांनी बसस्थानक बांधून देण्याची विनंती आमदार बेनके यांना केली. तेंव्हा आमदार अनिल बेनके यांनी मोरे यांची विनंती तात्काळ मान्य केली. तसेच आपल्या आमदार निधीतून शहरातील काडा कार्यालयासमोर आणि सेंट झेवियर्स हायस्कूलसमोर तालुक्याच्या ग्रामीण भागातील लोकांच्या सोयीसाठी एकूण दोन बसस्थानकं उभारून देण्याचे आश्वासन दिले.

दरम्यान, जि. पं. सदस्य मोहन मोरे हे सातत्याने जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या संपर्कात राहण्याबरोबरच वेळोवेळी त्यांची भेट घेऊन आपल्या मतदारसंघातील विकासकामांचा पाठपुरावा करत आहेत. आता बेळगुंदी जि. पं. मतदारसंघांतील लोकांच्या सोयीसाठी बस स्थानकं बांधून देण्याची विनंती त्यांनी आमदार बेनके यांच्याकडे केली आहे. मोरे यांच्या विनंतीला मान देऊन आता आमदार अनिल बेनके देखील उपरोक्त ठिकाणी दोन बसस्थानके उभारून देणार असल्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.