Saturday, May 11, 2024

/

लोंढ्यातील पत्रकाराची आत्महत्या

 belgaum

खानापूर तालुक्यातील लोंढा येथील वार्ताहराने स्वतःच्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आली आहे.

पुरुषोत्तम श्रीधर भूतकी वय 35 असे या आत्महत्या केलेल्या दुर्दैवी पत्रकाराचे नाव आहे.

Bhutki londha
याबाबत समजलेल्या अधिक माहितीनुसार पुरुषोत्तम हा लोंढा येथून मराठी दैनिकासाठी वार्ताहर म्हणून काम करत होता स्टेशन रोड लोंढा येथे आपल्या पत्नीसह फोटो स्टुडिओ देखील चालवत होता. परिसरात उत्कृष्ट फोटोग्राफर म्हणून त्याची ओळख होती. आज सायंकाळी घरात कुणी नसताना दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही. खानापूर पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास चालविला आहे.

 belgaum

त्याच्या पश्चात पत्नी, तीन मुली आई आणि दोन भाऊ असा परिवार आहे. व्यवसायात आलेल्या नुकसानीतून आलेल्या नैराश्याने हे कृत्य केले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.