belgaum

कित्तूर उत्सवाच्या खर्चाची माहिती देण्यास टाळाटाळ

0
Bhimappa gadad
Rti activist Bhimappa gadad
 belgaum

बेळगाव लाईव्ह : ऐतिहासिक कित्तूर उत्सवासाठी सरकारकडून मंजूर झालेला निधी आणि झालेला खर्च यासंबंधीची सविस्तर माहिती मिळावी म्हणून उत्तर कर्नाटक जोरात समितीचे राज्याध्यक्ष आणि माहिती हक्क कार्यकर्ते भिमप्पा गुंडप्पा गडाद यांनी अर्ज केला होता.

उत्सवातील व्हीआयपी गॅलरी, जेवण, वास्तव्य, कलापथके, जाहिराती आणि विविध सिव्हील कामांच्या खर्चाची सविस्तर माहिती मागण्यात आली होती.

या कामाची मुख्य जबाबदारी असलेल्या बेळगावच्या निर्मीती केंद्राला ४ फेब्रुवारी २०२५ रोजीच पत्र लिहून माहिती देण्यास सांगण्यात आले होते. मात्र, तब्बल सात महिने लोटूनही कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

 belgaum

त्यामुळे अप्पर जिल्हाधिकारी न्यायालयासमोर अपील दाखल करण्यात आले असता, न्यायालयाने १८ जुलै २०२५ रोजी आदेश देऊनही कागदपत्रे लपवून ठेवण्यात आली.

bhimappa gadad

या सर्व अनास्थेमुळे मागील वर्षाच्या उत्सवाच्या अनुदानात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे जोपर्यंत कित्तूर उत्सवाचा संपूर्ण हिशेब व कागदपत्रे दिली जात नाहीत,

तोपर्यंत निर्मीती केंद्राला नवीन कामांचे आदेश देऊ नये तसेच कोणतीही बाकी रक्कम किंवा निधी देऊ नये नये, अशी आक्रमक भूमिका घेत भिमप्पा गडाद यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.