belgaum
एकेकाळी शत्रू असलेले बनले मित्र-सतीशच्या विरोधी लोकांबरोबर रमेश यांची गुप्त बैठक –
राज्याच्या राजकारणात खळबळ माजविणार्‍या रमेश जारकीहोळी यांनी टीव्ही आणि वृत्तपत्रात ठळक बातमी प्रसिद्ध होण्याच्या कामात हात घातला असून बंधू सतीश जारकीहोळी यांच्याबाबत राजकीयदृष्ट्या गोंधळून गेलेल्या रमेशची यमकनमर्डी मतदार संघातील उद्योगपती बरोबर रहस्यमय बैठक घेऊन कुतुहल निर्माण केले आहे.
Ramesh jarkiholi
कट्टर शत्रू असलेले प्रसंगानुसार मित्र बनतात याप्रमाणे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे राजकीय विरोधक म्हणून ओळखल्या जाणार्‍या काही महनीय व्यक्तींबरोबर कॉंग्रेसचे बंडखोर आमदार रमेश जारकीहोळी यांनी गुप्त बैठक घेऊन सर्वांना आश्‍चर्याचा धक्का देण्याचे काम केले असल्याचे समजते.
शहरातील एका खासगी हॉटेलात त्यांनी अर्ध्या तासाहून अधिक काळ ही बैठक घेतली आहे. सतीश जारकीहोळी हे यमकनमर्डी मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करीत असून त्याच मतदार संघात उद्योगपती म्हणून ओळखल्या जाणार्‍या बी. बी. हंजी आणि रवि हंजी या उभयंताबरोबर रमेश जारकीहोळी यांनी गुप्त बैठक घेऊन चर्चा केल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात कुतूहल निर्माण केले असले तरी रमेश यांची एकंदर राजकीय वाटचाल फार गूढ असल्याचे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.