Thursday, December 5, 2024

/

110 मीटर उंच राष्ट्रध्वज बेळगावात फडकला

 belgaum

देशात सर्वाधिक उंचीवर असलेला राष्ट्र ध्वज बेळगावातील किल्ला तलावाच्या काठावर फडकलाअन बेळगाव शहराच्या इतिहासात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. सोमवारी सकाळी या ध्वजाचे अधिकृत उदघाटन झाले. 110 मीटर उंचीवर असलेल्या या ध्वजाला केवळ पाचच मिनिटात मशीनच्या सहाय्याने उचलत मराठा लाईट इंफंट्री रेजिमेंटल केंद्राच्या बँड मानवंदना देऊन फडकावण्यात आला यावेळी राष्ट्रगीत गायन देखील झाले. भारत पाक अटारी सीमेवरील ध्वज आणि बेळगावच्या ध्वजाची उंची  एकच आहे त्यामुळं हा ध्वज देशातील सर्वात उंच फडकणारा ध्वज ठरला आहे.

tallest-flagविजयी विश्व तिरंगा प्यारा झेंडा उंचा रहे हमारा… या गाण्या प्रमाणे सदा उंचीवर फडकणाऱ्या या राष्ट्र ध्वजाच उदघाटन सोहळ्यात पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी लिफ्ट मशीनचा बटन दाबून उदघाटन केलं.या ध्वजास  स्मारक ध्वज(मोनुंमेंटल फ्लॅग) असे संबोधण्यात येते त्याचे कापड पॉलिस्टर फॅब्रिक असून हवामानासाठी वेदर प्रूफ बनवण्यात आलं आहे.स्मारकीय ध्वज हे अधिकाधिक उंचीवर असतात.Bgm flagया ध्वजा साठी केंद्रीय गृह मंत्र्यालया कडून खास परवानगी मिळवण्यात आली असून त्या अनुसार कायमस्वरूपी हा ध्वज फडकत ठेवला जाणार आहे सकाळ संध्याकाळी लोकांना हा ध्वज पहाता येणार आहे.

रात्रीच्या वेळी देखील राष्ट्र ध्वज फडकू शकतो हा ध्वजाचा अपमान होऊ शकत नाही असा निकाल 2010 मध्ये बिलासपूर  उच्च न्यायालयाने  निर्वाळा दिला होता त्या नंतर 1971 ध्वज संहिता कायदा रात्रीच्या वेळो ध्वज फडकण्याचे दरवाजे खुले झाले होते.

बेळगाव शहर वासीयांच स्वप्न पूर्ण झालं आहे याकडे पाहून देश प्रेम जागृत करण्यास बेळगावकर जनतेला मदत होईल यामुळे कायम स्वरूपी सतत उंची वरील फडकणारा ध्वज पहाता येणार आहे अशी प्रतिक्रिया आमदार फिरोज सेठ यांनी दिली .

National flag

देशातील सर्वात उंच ध्वज आहे असा दावा देखील त्यांनी केलाय. असे पाच ध्वज तयार ठेवण्यात आले असून कधीही बदलले जाऊ शकतात  असेही त्यांनी नमूद केलं

या कार्यक्रमास जिल्हाधिकारी एस जिया उल्ला,मराठा सेंटरचे ब्रेगेडियर गोविंद कलवड,कॅटोंमेंट सी इ ओ दिव्या शिवराम,पालिका आयुक्त शशीधर कुरेर,पोलीस आयुक्त डी सी राजप्पा, उपायुक्त सीमा लाटकर,जिल्हा पंचायत अध्यक्षा आशा ऐहोळे बुडा आयुक्त शकिल अहमद आदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.