हेलिकॉप्टरमधून उतरून शत्रूच्या प्रदेशात कारवाई करून परत पुन्हा येणे अन तेही शत्रूच्या नजरेला न पडता, आपले लक्ष्य साध्य करून सुखरूप परतणे , सर्जिकल स्ट्राईक काय असतंय याचा थरार बेळगावातील मराठा सेंटरच्या जूनियर्स लीडर्स विंग मध्ये पहायला मिळाला. कमांडो शत्रूच्या कॅम्प मध्ये दाखल होतात कसे ?दशहतवाद्यांचा खात्मा करतात कसे? आणि पुन्हा आपल्या बेस कॅम्प वर जातात ही दृश्य अनुभवता आली.
निमित होते खास बेळगाव आणि पुणे येथील पत्रकार माध्यमाच्या प्रतिनिधींना बेळगावातील मराठा सेंटर अन प्रशिक्षण माहिती देण्याचे …..भारत मालदीव लष्कराच्या संयुक्त कवयाती कवरेज साठी पुणे येथील पत्रकार बेळगावला आले होते या निमित्ताने पत्रकारांना पुन्हा एकदा मराठा सेंटर प्रशिक्षणाची माहिती मिळाली.
शुक्रवारी सकाळी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर आणि जुनियर लीडर्स कमांडो विंगला माध्यमांच्या प्रतिनिधींनी भेट देऊन कमांडो आणि जवानांना दिल्या जाणाऱ्या खडतर प्रशिक्षणाची माहिती घेतली .मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर गोविंद कलवड आणि कमांडो विंगच्या अधिकाऱ्यांनी प्रशिक्षणाची माहिती देऊन मराठाच गौरवशाली इतिहास सांगितला .
खडतर प्रशिक्षण पूर्ण करून होतात द कमांडो आणि जवान- ब्रेगेडीअर गोविंद कलवाड
रिक्रूट म्हणून दाखल झालेल्या तरुणांना खडतर प्रशिक्षण देऊन परिपूर्ण सैनिक बनविण्याचे कार्य मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये केले जाते . तर ज्युनियर लीडर्स विंगच्या कमांडो विंग येथे मृत्यूवर मात करणाऱ्या कमांडचे प्रशिक्षण दिले जाते . जवान आणि कमांडो याना कशा पद्धतीचे कठीण प्रशिक्षण दिले जाते आणि प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांची देशसेवेसाठी केली जाणारी नियुक्ती याची माहिती दिली . मराठा सेंटरचे ब्रेगेडीअर गोविंद कलवड आणि अन्य अधिकाऱ्यांनी विस्तृत माहिती दिली.
कमांडो विंगमध्ये साप हाताळणे ,गोळीबार ,अतिरेक्यांविरुद्ध कारवाई ,शस्त्रास्त्रे दारुगोळा हाताळणे ,शत्रूच्या नजरेला न पडता आपले लक्ष्य सध्या करून सुखरूप परतणे (सर्जिकल स्ट्राईक)आदी कमांडोना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षण दाखविण्यात आले . मराठा सेंटरमध्ये ड्रिल ,शस्त्रास्त्र हाताळणे ,हेलिकॉप्टरमधून उतरून शत्रूच्या प्रदेशात कारवाई करून परत येणे ,गोळीबार या बरोबरच तंदुरुस्तीसाठी दिले जाणारे एरोबिक्स ,मल्लखांब यांची प्रात्यक्षिके मराठाच्या जवानांनी माध्यम प्रतिनिधी समोर सादर केली .दीपक जोशी यांनी साप पासून कसा बचाव करणे सर्प दंश झाल्यावर काय करणे आदी प्रात्यक्षिक दाखवली. स्विमिंग जिम्नॅस्टिक आदींचा प्रशिक्षण दाखवण्यात आल..