शहराच्या प्रथम नागरिकास नवीन कार मिळावी या मागणी साठी माजी महापौर उपमहापौरांनी आंदोलन केल होत मात्र याचा लाभ नूतन महापौरांना झाला आहे. महापौर संज्योत बांदेकर यांना पालिकेच्या वतीनं नवीन वेरना कार प्रदान करण्यात आली. अम्ब्यासडर कार ऐवजी आता वेरना मधून महापौर फिरणार आहेत. माजी महापौर सरिता पाटील यांनी आगळं वेगळं आंदोलन केलं होतं याचा लाभ मला झाला अशी प्रतिक्रिया महापौर संज्योत बांदेकर यांनी दिली आहे. माजी महापौरांनी सभागृहात ठराव केला होता यामुळं नवीन कार मिळाली आहे.वार्डातील समस्या सोडवण्यास फिरताना या कार चा वापर होईल असंही महापौर म्हणाल्या.
उपमहापौरांना पाडव्या दिवशी
तसं पाहिलं तर महापौर संज्योत बांदेकर आणि उपमहापौर नागेश मंडोळकर यांनी एकाच दिवशी नवीन कार घ्यायची होती मात्र मराठी गटात सगळं काही अलबेल नसल्याने उपमहापौरांनी पाडव्या दिवशी आणि महापौरांनी आज नवीन कार घेतली आहे.गट नेते पंढरी परब हे माझ्याशी दुजाभाव करत आहे असा आरोप उपमहापौर मंडोळकर यांनी बेळगाव live कडे केला आहे